दिंडी

पाऊले चालती पंढरीची वाट....
सुखी संसाराची तोडुनिया गाठ...
गांजूनिया भारी दुःख दारिद्र्याने....
करता रिकामे भाकरीचे ताट ....
पाऊले चालती पंढरीची वाट.... 
बघतोय सारे सगे सोयरे ते.....
पाहून हे सारे फिरवते पाठ.....
पाऊले चालती पंढरीची वाट....…       
दिंडी 
हा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आध्यात्मिक सांस्कृतिक ठेवा आहे हा भक्तीचा मेळा समता बंधुता जोडणारा दुवा आहे माणूस हा केंद्रबिंदू ठेवून भक्ती मार्गाने माणसा माणसाला जोडणारा उत्सव सोहळा आहे.पूर्वी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघत त्यांच्या हातामध्ये ध्वज भगवी पताका असे या मिरवणुकीस दिंडी असे म्हणत 
कालांतराने याचे स्वरूप बदलून अनेक लोक एकत्रित येऊन पंढरपूर कडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी चालत येत या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूर येथे उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेणे हे असते या पायी निघालेल्या लोकांच्या समूहास वारकरी असे म्हणतात खांद्यावर भगवी पताका घेऊन हे लोक मैल दर मैल प्रवास करतात कपाळी टिळा गळ्यात तुळशीची माळ मुखी हरी नामाचा गजर करत हे वारकरी चालत राहतात पंढरपूरची वारी भक्ती प्रेमाचा एक विलक्षण असा अनुभव असतो पंढरपूरच्या या वारीस हजारो वर्षांचा इतिहास परंपरा आहे वर्षात होणाऱ्या चार वाऱ्यांपैकी आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून शेकडो संतांच्या सतपुरुषांच्या पालख्या ह्या पंढरपूर कडे येण्यासाठी निघतात वारी ही एक साधना असून दिंडी हे एक साधन आहे या दिंड्यांचा पालखीचा इतिहास परंपरा फार मोठी आहे मनुष्य जीवन समृद्ध व संपन्न कसे करावे याचा सुलभ राज्यमार्ग म्हणजे दिंडी होय वारकरी सांप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वर प्रेमाची अनुभूती अणुभवणारा मार्ग मार्गक्रमण करतात हिंदू धर्माच्या निरनिराळ्या अवस्थान मधून परिणत होत आलेला परिपूर्ण भक्तिपंथ आहे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील विविध संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय होय  वारी - प्रत्येक संप्रदायाचे एक वैशिष्ट्य असते वारी म्हणजेच वारी करणारा वारकरी संप्रदाय होय भक्ती पंथ माळकरी पंथ असेही काही लोक या संप्रदायास म्हणतात पंढरपुराच्या विठ्ठलाचे भक्त हे अनेक वेगवेगळ्या समूहांसोबत पंढरपुराकडे चालत येतात या समूहास नेतृत्व करणाऱ्यारा फडाशी संलग्न त्या फडाच्या प्रमुखांकडून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात व दरवर्षी पंढरपूरला वारी सोबत दर्शनाला जातात वारी ही सातत्याने वर्षानुवर्ष घडणारी साधना असून अनेकांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी वृत्त म्हणून केली जाते अशी हजारो वारकरी घराणे महाराष्ट्रामध्ये आज रोजी आहेत सातत्य नियमितपणा जसे वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे तसे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी म्हणजे एकट्याने नव्हे तर समूहाने करावयाची असते पंढरपूरची वारी ही सामूहिक भक्तीचा मार्ग आहे सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून मुखी हरी नामाचा जप करत टाळमृदुंगाच्या गजरामध्ये वाजत गाजतं नाचत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पद्धत आहे आशा प्रकारे टाळ मृदंगासह हाथी भगवी पताका खांद्यावर घेऊन अभंग गात पायी पंढरीस जाणाऱ्या वारकरऱ्यांचा समुदाय म्हणजे दिंडी

Comments